Tripura Crime Saam tv
देश विदेश

Tripura Crime News: एका पिशवीत डोकं, दुसऱ्यामध्ये सापडलं धड; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, ९ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

Crime News: पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

Tripura News: पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करत शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. त्रिपुरातील आगरतळा येथे ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तनुजा बेगम असे या मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. तसेच आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी मृतदेहाचे तुकडेही जप्त केले आहेत. (Latest Marathi News)

याबाबत तनुजाचा धाकटा भाऊ बपन मियाँने सांगितलेल्या माहितीनुसार, तनुजा गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता होती. तिच्या आईचा तिच्याशी कसलाच संपर्क होत नव्हता. त्यामुळेच ती मुलीच्या सासरी आगरतळा येथील मुस्लिमपारा भागात तिला शोधण्यासाठी गेली. ज्या ठिकाणी तिची मुलगी तिच्या पतीसोबत राहत होती. मात्र तनुजाच्या आईला त्या ठिकाणीही ती सापडली नाही.

मात्र घरामध्ये रक्ताचे डाग आढळल्याने तनुजाच्या आईला संशय आल्याने त्यांनी आरडा ओरडा केला. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कायम मियाँचा शोध सुरु करत अटक केली.

चौकशीदरम्यान कायम मियाँ याने पत्नी तनुजाच्या हत्येची कबुली दिली असून, हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून दोन पिशव्यांमध्ये भरून जंगलात ठेवल्याचेही सांगितले आहे. आरोपीच्या सांगण्यावरुन दोन्ही पिशव्या जप्त केल्या असून पिशव्यांमधून महिलेच्या मृतदेहाचे तुकडेही जप्त करण्यात आले आहेत.

महिलेचे शीर एका पिशवीत सापडले, तर उर्वरित धड दुसऱ्या बॅगेत सापडले. तनुजा आणि कायेम मियाॅंचे ९ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT