बनासकांठा जिल्ह्यात SUV आणि बसचा भीषण अपघात, ५ मृत, ९ जखमी Google
देश विदेश

Accident : कार-बसचा भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू, ९ जण गंभीर जखमी

Gujarat Accident News: बनासकांठा जिल्ह्यात SUV कार आणि बस यांची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका जोडप्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. तर, ९ जण गंभीर जखमी असून त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुजरातमधील बनासकांठा जिल्हात SUV कार आणि बस यांची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या घटनेत एका जोडप्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमीरगड शहराजवळ दुपारी ४:३०च्या सुमारास हा अपघात घडला. SUV कारला धडकलेली बस ही राज्यस्थान राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची होती.

अमीरगडचे पोलीस निरीक्षक एस.के. परमार म्हणाले, "बस राज्यस्थानमधील सिरोहीकडे जात असताना हा अपघात झाला. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, एसयूव्हीचा चालक महामार्गावर चुकीच्या दिशेने गाडी चालवत होता. या अपघातात चालकाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेत SUV कार चालकासह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे.

या अपघातात बस मधील ६ प्रवाशांसह ९ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस.के. परमार यांनी दिली. या अपघातात चालकासह त्याची पत्नी मेवलीबेन, दोन मुलं रोहित आणि ऋत्विक यांच्यासह सुंदरीबेन सोलंकी अशी मृतांची ओळख पटली आहे. हे सर्व मृतव्यक्ती अमीरगड तालुक्यातील धनपुरा येथाल रहिवासी होते.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

SCROLL FOR NEXT