pubg game Saam Tv News
देश विदेश

PUBG Train Accident: रेल्वे रूळावर बसून पबजी खेळत होते, रेल्वेनं उडवलं; तिघांचा मृत्यू

Three Teens Killed by Train: रेल्वे रूळावर बसून पबजी खेळणं तीन मुलांच्या चांगलंच जीवानीशी आलंय. बिहारमधील ३ मुलं रेल्वे ट्रॅकवर बसून पबजी गेम खेळत होते. समोरून ट्रेन आली, आणि ट्रेनच्या धडकेत तिघांचाही मृत्यू झालाय.

Bhagyashree Kamble

रेल्वे रूळावर बसून पबजी खेळणं तीन मुलांच्या चांगलंच जीवानीशी आलंय. बिहारमधील ३ मुलं रेल्वे ट्रॅकवर बसून पबजी गेम खेळत होते. कानात इयरफोन होते. त्यामुळे बाहेरचं काही ऐकू येणं शक्यच नाही. तिघंही खेळण्यात मग्न. समोरून ट्रेन आली, आणि ट्रेनच्या धडकेत तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या पश्चिमच्या चंपारण जिल्ह्यातील नरकटियागंज ते मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनवर घडली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

चंपारण जिल्ह्यातील गुमटी येथील फुरकान आलम, सरीम आलम आणि हबीबुल्ला अन्सारी ही तिन्ही मुले रेल्वे रूळावर बसले होते. तिघंही पबजी गेम खेळण्यात गुंग होते. तसेच त्यांच्या कानात इयरफोन देखील होते. ते खेळण्यात इतके गुंग झाले की, त्यांना ट्रेनचा आवाज देखील ऐकू आला नाही. त्यामुळे कधी रेल्वे आली त्यांना कळालचं नाही. रेल्वे सुसाट वेगानं आली, आणि जबर धडक बसली. रेल्वेच्या या धडकेत तिघांचाही दुर्देवी मृत्यू झालाय.

तिघांचा झालेल्या दुर्देवी मृत्यूनंतर, त्यांच्या कुटुंबियांनी तिघांचेही मृतदेह घरी नेले आणि तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आलंय. या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली असून, नेमक्या कोणत्या कारणामुळे हा अपघात घडला याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.

या धक्कादायक घडलेल्या घटनेची माहिती देताना एसडीपीओ विवेक दीप सांगतात, 'अपघात नेमका कसा घडला? अपघाताची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी, आमचा त्या दिशेनं तपास सुरू आहे. यासंदर्भात आम्ही कुटुंबियांचे जबाब घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्राथमिक तपासात तिघंही मुलं रेल्वे रूळावर बसून पबजी गेम खेळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुलांच्या गेमिंग सवयींबद्दल पालकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Poses For Periods: मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कोणती योगासने करावीत?

Maharashtra Live News Update : महाड MIDC मधील एम्बॉलो कंपनीला पुन्हा आग

Sanja Recipe: संध्याकाळी लागलेल्या हलक्या भूकेसाठी झटपट घरी बनवा खमंग आणि चविष्ट सांजा, वाचा सोपी रेसिपी

Gold, Silver Rate: बाजारातील चमक उडाली! सोन्यासह चांदीचे दर घसरले; चांदीच्या किमतीत ११,००० रुपयांची घसरण, जाणून घ्या आत्ताचे नवे दर

अजित पवारांच्या अपघातामध्ये गुन्हेगारी कट? CID ने काय सांगितले? VIDEO

SCROLL FOR NEXT