Constable Death X
देश विदेश

आत्महत्या करण्यासाठी महिलेने कालव्यात मारली उडी, वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला

Constable Death News : एका महिलेला वाचवण्यासाठी कालव्यात उडी मारणाऱ्या वाहतूक पोलीस हवालदाराला जीव गमवावा लागला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला वाचली पण हवालदाराचा मृत्यू झाला.

Yash Shirke

एका महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात उडी मारली. तिचा जीव वाचवण्यासाठी पोलीस हवालदाराने देखील पाण्यामध्ये उडी मारली. पण महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. या पोलीस हवालदाराचे नाव अंकित तोमर (वय ३०) असे आहे. सदर घटना गाझियाबादमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१७ मे) सकाळी गाझियाबादच्या वैशाली सेक्टर २ येथील रहिवासी आरतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरती आणि तिचा पती आदित्य यांच्यात घरगुती वाद झाला होता. तेव्हा रागाच्या भरात आरतीने कालव्यात उडी मारुन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. तिला वाचवण्यासाठी वाहतूक पोलीस हवालदार अंकित तोमर यांनी कालव्यात उडी मारली.

आरतीला वाचवण्यासाठी अंकित तोमर यांनी पाण्यात उडी मारली. आरतीला वाचवण्यात यश आले. पण हवालदार तोमर कालव्याच्या चिखलात अडकले. त्यांना चिखलातून बाहेर काढल्यानंतर जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

पोलीस उपायुक्त निमिश पाटील म्हणाले, आत्महत्या करण्यासाठी कालव्यात उडी मारणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी वाहतूक उपनिरीक्षक धर्मेंद्र आणि हवालदार अंकित तोमर यांनी कालव्यात उडी मारली. आरतीला यशस्वीरित्या वाचवण्यात आले. पण धर्मेंद्र आणि अंकित कालव्याच्या चिखलात अडकले. धर्मेंद्र धर्मेंद्र स्वतःला बाहेर काढण्यात यशस्वी झाले, पण तोमर अडकून राहिला. खूप मेहनतीने अंकितला बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT