Kerala Breaking News Saam TV
देश विदेश

Kerala Boat Accident: केरळमध्ये मोठी दुर्घटना; बोट उलटून 16 पर्यटकांना जलसमाधी, बचावकार्य सुरू

Kerala Boat Incident: केरळमध्ये मोठी दुर्घटना; बोट उलटून 16 पर्यटकांना जलसमाधी, बचावकार्य सुरू

Satish Kengar

Kerala Breaking News: केरळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटक बोट उलटून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन उद्या सकाळी तनूर अपघात स्थळाला भेट देणार आहेत. पिनाराई विजयन यांचे उद्या होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 लोक होते. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या १६ झाली असल्याची माहिती राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी दिली.  (Latest Marathi News)

हा अपघात  (Accident) रात्री झाला असून अशा परिस्थितीत मदत दलाच्या जवानांना बचावकार्य करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारातही लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. बचावासाठी टॉर्चच्या प्रकाशात लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

केरळमधील या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT