Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices : वाहनधारकांना दिलासा! 'या' चार राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले.

साम टिव्ही ब्युरो

Petrol Diesel Prices : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले. आज काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले आहेत, तर काही राज्यांमध्ये वाढ झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Latest Price)

गेल्या काही दिवसांपासून आंतराराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात सातत्याने घट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 92.37 पर्यंत घसरली आहे, तर WTI प्रति बॅरल $ 87.13 वर पोहोचली आहे.

दरम्यान, आज बिहारमध्ये पेट्रोल 51 पैशांनी कमी होऊन 109.15 रुपये प्रति लीटर तर डिझेल 48 पैशांनी 95.80 रुपये प्रति लीटरवर आले आहे. त्याच वेळी, पंजाबमध्ये, पेट्रोल 22 पैशांनी घसरून प्रतिलीटर 96.68 रुपये आणि डिझेल 21 पैशांनी घसरून प्रतिलीटर 87.03 रुपयांवर आले.

राजस्थानमध्ये पेट्रोल 15 पैशांनी कमी झाले. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातही पेट्रोलचे दर 20 पैशांनी कमी झाले आहेत. दुसरीकडे, हिमाचल, गुजरात आणि तेलंगणामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT