Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel : वर्षाच्या शेवटच्या दिवशी इंधनाच्या दरात मोठा बदल? जाणून घ्या नवीन दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel : आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. दररोज प्रमाणे 31 डिसेंबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत. (Petrol Diesel Latest Price)

गुजरातमध्ये आज पेट्रोल 0.58 पैश्यांनी महागल्यानंतर 97.04 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, राज्यात डिझेलचा दर प्रतिलिटर 92.82 रुपयांवर पोहोचला आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 0.25 पैश्यांनी महागले असून ते 96.60 रुपये आणि डिझेल 86.96 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. महाराष्ट्रातही पेट्रोलचा दर 0.24 पैश्यांनी वाढून 106.21 रुपयांवर पोहोचला आहे. येथे डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर केरळ, गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थोड्या कमी झाल्या आहेत.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT