Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार meta ai
देश विदेश

Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार

Fssai pan masala rules : तंबाखू आणि निकोटिनयुक्त गुटखा आणि पानमसाल्यावर एका वर्षाची बंदी घातली आहे. विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्या राज्यातील सरकारने हा निर्णय घेतला जाणून घेऊयात...

Saam Tv

तंबाखू आणि निकोटिनयुक्त गुटखा तसेच पानमसाला तयार करणे, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही. तंबाखूजन्य गुटखा, पानमसाल्यावर कर्नाटक सरकारनं एका वर्षाची बंदी घातली आहे. विक्री आणि साठा करणाऱ्यांविरोधातही कठोर पावलं उचलली आहेत. राज्यात अशा उत्पादनांवर एका वर्षासाठी प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. बंदी असतानाही या पदार्थांची विक्री किंवा साठा केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिला आहे. आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, ही बंदी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे गुटखा, तंबाखू आणि निकोटिनयुक्त पानमसाल्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. या पदार्थांची विक्रीच नव्हे, तर याचा अवैध साठा करून ठेवणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.

अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत, तंबाखू आणि निकोटिनयुक्त खाद्यपदार्थांच्या नियमांच्या आधारे ही कारवाई करण्यात येणार आहे. असे पदार्थ खुले, पाकीटबंद किंवा सॅशेमध्ये विकले जाणार असले तरी, त्यांच्यावरही निर्बंध लागू होणार आहेत. याशिवाय कोणत्याही पदार्थांमध्ये तंबाखू किंवा निकोटिन आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पान मसाल्यांच्या पॅकेजिंगमध्येही FSSAI चे विविध नियम स्पष्ट केले आहेत. पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक लॅमिनेट, अॅल्युमिनियम फॉईल आणि इतर गोष्टींबाबत नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पानमसाला उत्पादक कंपन्यांसाठी आता पॅकेजिंगवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अन्न सुरक्षा विभागाकडून दुकाने आणि गोदामांवर धाड टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्नाटकातील पानटपरी आणि इतर विक्रेत्यांचे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

गोवा जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील 5 नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

Weather Update: विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता; ६ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Sunday Horoscope: आज कोणाला मिळणार पैशांचा फायदा, कोणाच्या आयुष्यात फुलणार प्रेम? वाचा राशिभविष्य

महाराष्ट्रात पुन्हा खंजीर, पुन्हा गद्दारी? 'पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा; वडेट्टीवारांचा घणाघात

पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेसेनेचं आव्हान, डिलिमिटेशनवरून ठाकरे विरुद्ध पवार

SCROLL FOR NEXT