TMC MOVES SUPREME COURT OVER 20 REBEL MPS; ABHISHEK BANERJEE’S PLEA HEARING 
देश विदेश

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात होणार बंडखोर खासदारांचा फैसला; २०खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

West Bengal Politics MPs’ Disqualification : बंडखोर २० खासदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबावरून टीएमसीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ मंगळवारी अभिषेक बॅनर्जी यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे

Bharat Jadhav

  • टीएमसीची २० बंडखोर खासदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

  • अभिषेक बॅनर्जी यांची खासदार अपात्रतेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

  • २० बंडखोर खासदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात विलीन होणाऱ्या खासदारांविरुद्धात टीएमसीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. टीएमसी आणि २० बंडखोर खासदार यांच्यातील वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलाय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी करत पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आज मंगळवारी टीएमसीच्या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील टीएमसीच्या (TMC) पराभवानंतर पक्षाच्या संसदीय गटामध्ये बंडखोरी झाली. २० खासदारांनी पक्ष सोडून 'नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया' (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान बंडखोर गटाने लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्याची मागणी केलीय. दुसरीकडे हे खासदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात सामील होण्याचा त्यांचा निर्णय 'पक्ष-बदल विरोधी कायद्या'च्या (अँटी-डिफेक्शन लॉ) तरतुदींच्या कक्षेत येतो, असा दावा करत टीएमसीनं त्यांच्यावर अपात्रेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलीय.

टीएमसीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

यापूर्वी अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्याबाबतच्या स्वतंत्र याचिका सादर करून त्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनादरम्यान, लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर टीएमसी खासदारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर, या बंडखोर टीएमसी खासदारांनी एनडीएला (NDA) पाठिंबा जाहीर केला आणि त्यांना एनडीएच्या बैठकीसाठी निमंत्रितही करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

भंडारा, महाप्रसादासाठी FDAची परवानगी बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा होईल दाखल

SCROLL FOR NEXT