violence SaamTv
देश विदेश

TMC नेत्याच्या हत्येमुळे हिंसाचारावर केंद्राने मागवला ममता सरकारकडून अहवाल

पश्चिम बंगाल मधील बीरभूम जिल्ह्यामधील रामपूरहाट येथे झालेल्या हिंसाचारामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था

कोलकाता: पश्चिम बंगाल मधील बीरभूम जिल्ह्यामधील रामपूरहाट येथे झालेल्या हिंसाचारामध्ये (violence) ८ जणांचा मृत्यू झाला आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पश्चिम बंगालच्या खासदारांनी (MP) आज गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर खासदारांनी दावा केला आहे की, अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी ७२ तासामध्ये राज्य सरकारकडून (State Government) या प्रकरणी अहवाल मागून घ्यावा.

हे देखील पहा-

पश्चिम बंगालचे (West Bengal) डीजीपी मनोज मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार की, या हिंसाचारामध्ये १० नव्हे तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले, आज सकाळी एका घरामधून ७ मृतदेह सापडले आहेत. १० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मात्र, ही संख्या चुकीची होती. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मनोज मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार की, रात्री तृणमूल काँग्रेस नेते बहादूर शेख यांच्या हत्येची बातमी आल्यावर तासाभरामधेच जवळपास ८ घरे जाळण्यात आली आहेत.

याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. या घटनेनंतर रामपूरहाटचे एसडीपीओ आणि प्रभारी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. हिंसाचाराच्या या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर यावेळी हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की आहे की, संपूर्ण राज्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. मागील एका आठवड्यामध्ये राज्याच्या विविध भागामध्ये २६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कायदा आणि पश्चिम बंगालमध्ये सुव्यवस्था बिघडत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

By-Election: मविआ की सुनेत्रा पवार? बारामती पोटनिवडणूकाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील: संजय राऊत

Bollywood Celebrities: नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या सेलिब्रेशनला बॉलिवूडचा ग्लॅमर

SCROLL FOR NEXT