tmc news  Saam tv
देश विदेश

देशाच्या राजकारणात उलथापालथ; माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का, बंडखोर खासदारांचा नवा पक्ष ठरला?

tmc latest news : देशाच्या राजकारणात उलथापालथ मोठी घडण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बंडखोर खासदार नव्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

तृणमूल काँग्रेस फुटीच्या मार्गावर

बंडखोर खासदारांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

बंडखोर खासदार नव्या पक्षात प्रवेश करण्याची चर्चा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्ष फुटीच्या मार्गावर आहे. तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्या नेतृत्वात बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसीचे बंडखोर खासदार Nationalist Citizen party मध्ये विलीन होणार असल्याचे बोलले जात आहे. या पक्षाचं आसाम,त्रिपुरा, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतात अस्तित्व आहे. या पक्षाच्या माध्यमातून 'एनडीए'ला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी १९ खासदारांनी सह्या केलेलं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं. या पत्रात टीएमसीने वेगळा गट स्थापन केल्याचा दावा केला होता. टीएमसीच्या बंडखोर गटाने 'एनडीए'ला समर्थन देण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

त्यानंतर आता टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी रविवारी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. या बैठकीला खासदार निशिकांत दुबे देखील उपस्थित होते. दुसरीकडे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या तर्फे खासदार किर्ती झा आझाद, सागरिका घोष यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांचं पत्र देऊन बंडखोर गटाला मान्यता न देण्याचं आवाहन केलं. बंडखोर खासदारांच्या गटाला संसदीय पक्ष म्हणून मान्यता देणे संविधान आणि कायद्याच्या विरोधात आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.

दुसरीकडे टीएमसीच्या वरिष्ठ खासदार सौगत रॉय यांनी बंडखोर खासदारांच्या लोकसभा अध्यक्षांच्या भेटीवर भाष्य करताना म्हटलं की, 'मी काय बोलू? ते लोक पक्ष सोडतात. ते पश्चिम बंगालमधील ऑपरेशन लोटसच्या इन्चार्जची भेट घेतात. यात कोणतंही आश्चर्य नाही .आज ते लोकसभा अध्यक्षांना भेटले. आम्ही भाजप आणि एनडीएच्या विरोधात लढलो. एनडीएत सामील होणे सारासार चुकीचे आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

SCROLL FOR NEXT