TIGER SHROFF FIRING: SECURITY INCREASED AT DISHA PATANI’S BAREILLY HOME saam tv
देश विदेश

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; बॉलीवूड भीतीच्या छायेत

Tiger Shroff Firing Incident And Disha Patani Security Update: टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस सतर्क झाले आहेत. दिशा पाटणीच्या बरेलीतील घराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Omkar Sonawane

मुंबईतील जुहू परिसरात बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटणेननंतर उत्तर प्रदेश पोलिसही सतर्क झाले आहेत. अभिनेत्री दिशा पाटणीच्या बरेली येथील घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गोल्डी बरार आणि रोहित गोदारा गँगने दिशा पाटणीच्या घरावर सलग दोन दिवस गोळीबार केला होता. आता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर दिशाच्या घरावरील हल्ल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

रविवारी मुंबईत टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर काही तासांतच दिशा पाटणी टायगरच्या घरी पोहोचली होती. दुसरीकडे उत्तरप्रदेश पोलिसांनीही दिशाच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर बरेलीमध्ये दिशा पाटणीच्या घराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक दाखल झाले. गेल्या वर्षी घरावर झालेल्या गोळीबारानंतर तेथे एक हेड कॉन्स्टेबल आणि चार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच पाटणी कुटुंबाला तीन सशस्त्र सुरक्षा रक्षकही देण्यात आले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिशा पाटणीचे वडिलांशी चर्चा करून सुरक्षेची माहिती घेतली. तसेच घराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिशा पाटणी ही उत्तर प्रदेशमधील बरेली येथे राहते. या निवासस्थानी तिचे वडील आणि बहीण खुशबू पाटणी राहतात. गेल्या वर्षी दिशा पाटणीच्या बरेली येथील घरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर अनेक महत्त्वाचे तपशील आले होते. या प्रकरणात रविंद्र हा मुख्य शूटर असल्याचे समोर आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT