Tiger Shroff Firing Case Update News  AI image
देश विदेश

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; सुरत एक्सप्रेसमधून २ आरोपींना घेतलं ताब्यात

Tiger Shroff Firing Case Update : टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर सुरत एक्सप्रेसमधून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे

Namdeo Kumbhar

साक्षी यादव, मुंबई प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील कोटा पोलिसांनी या प्रकरणातील २ संशयिताला ताब्यात घेतले आहे. टायगर श्राफ याच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला होता. अंधेरीत दुचाकी टाकून आरोपींनी रेल्वेने पळ काढला होता. आता आरोपींना सूरत एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोटा रेल्वे स्थानकावरून या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाची कोटा पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसेच, सुरक्षेचा मुद्दा आणि तपासाच्या गोपनीयतेमुळे ताब्यात घेतलेल्या संशयिताची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. या प्रकरणासंदर्भात कोटा पोलिसांकडून लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे (Mumbai Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे. सुरुवातीला या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनेची संवेदनशीलता पाहता तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गोळीबार करणाऱ्या तीन अज्ञात आरोपींचा शोध घेणे हे सध्या पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. यातील २ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग?

यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास मुंबई क्राईम ब्रँचने यशस्वीपणे केला आहे. त्यामुळे टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडलेले आहेत का, याचाही सखोल तपास आता क्राईम ब्रँचकडून केला जाणार आहे. लवकरात लवकर आरोपींची ओळख पटवून त्यांना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिलिव्हरी बॉईज अन् कॅब चालकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शनचा नवा मार्ग मोकळा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट आरोपी सुरतच्या दिशेने रवाना

Accident News : देवदर्शनाला गेलेल्या मित्रांचा तो दिवस अखेरचा ठरला! भरधाव ट्रकच्या धडकेत ४ तरुणांचा मृत्यू; चार जखमी

Foods Storage Tips In Fridge: फ्रिजमध्ये 7 पदार्थ चुकूनही ठेवू नका : आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Marathi Natak : प्रसिद्ध अभिनेते घेऊन येतायेत नवं नाटक! मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत सस्पेन्सचा थरार, २३ व्या मजल्यावर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT