murder SaamTvnews
देश विदेश

भयंकर! गोरखपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणानं मुलीसह अख्ख कुटुंब संपवलं

नरेश शेंडे

गोरखपूर : उत्तप्रदेशच्या गोरखपूरमध्ये (Gorakhpur crime) धक्कादायक घटना घडलीय. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणानं मुलीसह कुटुंबातील (Triple murder case) तीन जणांची गळा चिरुन हत्या केलीय. गोरखपूरमध्ये सोमवारी रात्री हा तिहेरी हत्याकांड घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका (culprit arrested) आरोपीला अटक केली आहे. अलोक पासवान असं अटक केलेल्या आरोपीचं आहे. तर रायगंज येथील गामा (४२), त्याची पत्नी संजू निशाद (३८) आणि मुलगी प्रिती (२०) अशी हत्या झालेल्यांची नाव आहेत. या भयंकर घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, गामा आपल्या कुटुंबासोबत भावाच्या लग्नसोहळ्याला जात होते. त्यावेळी घरापासून काही अतंरावर पोहचल्यावर तीन अज्ञात इसमांनी गामासह कुटुंबियांवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच एडीजी अखिल कुमार, एसएसपी डॉ विपीन टाडा, पोलीस अधिक्षक कृष्ण कुमार विष्णोई यांनी फॉरेन्सीक टीमसह घटनास्थळी धाव घेवून या प्रकरणाचा तपास सुरु केला.

त्यानंतर हत्या झालेल्या तिघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अलोक पासवानला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. आरोपी अलोकचं गामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. गामाच्या मुलीनं आरोपी अलोकला प्रेमसंबंधासाठी नकार दिला होता. त्यामुळे त्याने बदला घेण्यासाठी गामाच्या कुटुंबियांची हत्या केली. अशी माहिती प्राथमिक तपास समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT