आश्चर्यकारक! बिहारमध्ये तीन हात पायांच्या बाळाचा जन्म Saam Tv
देश विदेश

आश्चर्यकारक! बिहारमध्ये तीन हात पायांच्या बाळाचा जन्म

सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - बिहारच्या गोपाळगंजमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. गोपाळगंजमध्ये तीन पाय आणि तीन हात असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाला पाहून सर्वच हैराण झाले आहेत. आता या बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जात आहे. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचे म्हटले आहे. तीन हात आणि पाय असलेल्या या बाळाला पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. या बाळाची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

हे देखील पहा -

कुटुंबीयांनी अल्ट्रासाऊंड केलं त्यावेळी रिपोर्टमध्ये याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. या बाळाची अवस्था गंभीर असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, वैकुंठपूर येथील रेवतिथमध्ये राहणारे मोहम्मद रहीम अली यांच्या 30 वर्षीय पत्नी रबीना खातून यांना प्रसुतीकळा सुरू झाल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर त्यांना तीन हात-पाय असलेल्या बाळ जन्माला आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लाख मुलांमध्ये अशी एखादीच घटना घडत असल्याचे सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT