Threat of new cyclone in Bay of Bengal imd warning rainfall many State in India Saam TV
देश विदेश

Cyclone Alert: बिपरजॉयपेक्षाही महाभयंकर चक्रीवादळ येणार? प्रचंड ताकदीने वारे वाहणार, नेमकं कुठे धडकणार?

IMD New Cyclone Alert: ओडिशा किनारपट्टी भागात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दोन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

Satish Daud

IMD New Cyclone Alert

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी देशातील काही राज्यांवर अवकाळी पावसाचं संकट येऊन ठेपलं आहे. त्यातच ओडिशा किनारपट्टी भागात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दोन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यातील एक चक्रीवादळ 'बिपरजॉय'पेक्षाही दुप्पट धोकादायक असू शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एनआयने हवामान खात्याच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. वृत्तानुसार, ओडिशा किनारपट्टी भागात १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा ताशी वेग ४५ ते ६५ किमी इतका असू शकतो. परिणामी, देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

ओडिशा किनारपट्टी भागात वाहणाऱ्या या वाऱ्याचं रुपांतर पुढे चक्रीवादळात होऊ शकतं. यातील एक चक्रीवादळ 'बिपरजॉय'पेक्षाही दुप्पट धोकादायक असू शकते, मच्छिमारांनी १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान समुद्रात जाऊ नये, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याने १५ नोव्हेंबर रोजी ओडिशाच्या काही किनारी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर चक्रीवादळामुळे येत्या काही दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, असेही सांगण्यात आले आहे.

हवामानशास्त्रज्ञांनी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागांमध्ये तयार झालेल्या आणखी एका चक्रीवादळाचे निरीक्षण केल्याचं सांगितलं जातंय. जर चक्रीवादळ आलं, तर त्याला 'मिधिली' नाव दिलं जाईल, असं दक्षिण कोरियाच्या जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीच्या टायफून रिसर्च सेंटरचे संशोधन शास्त्रज्ञ विनीत कुमार सिंग यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

SCROLL FOR NEXT