Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

ही गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात आहे - अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

वृत्तसंस्था

गोवा- गोवा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सांखळी मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे आता गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्यात भाजप सध्या 19 जागांवर आघाडीवर आहे. तर गोव्यात ‘आप’ने देखील दोन जागा जिंकल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले आहे. ट्विट करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, गोव्यात ‘आप’ने दोन जागा जिंकल्या आहेत. कॅप्टन वेंझी आणि क्रूझ यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. ही गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात आहे, असे ट्विट आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केले.

दरम्यान, भाजप मगोपला सोबत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यातील भाजप नेते आज गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे वृत्त आहे. गोव्यात भाजप आजच सरकार स्थापनेचा दावा करु शकते. तर येत्या 14 मार्चला शपथविधीचा कार्यक्रम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

"गोव्यात भाजप सरकार स्थापन करणार; आम्ही एमजीपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊ", असे गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT