Employees Saam Tv
देश विदेश

'या' कंपनीची मोठी घोषणा! कर्मचाऱ्यांना देणार आठवड्यातून 3 दिवस सुट्या...

एक प्रसिद्ध कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन सुट्या देणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून फक्त 4 दिवस कामावर यावे लागणार आहे.

वृत्तसंस्था

मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन सुट्ट्या देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून केवळ 4 दिवस कामावर यावे लागणार आहे. कंपनीच्या या निर्णयाची सध्या जगभरात चर्चा होत आहे.

या कंपनीचे नाव पॅनासोनिक (Panasonic) असून ती जपानी (Japanese) कंपनी आहे. पॅनासोनिकने जपानी सरकारच्या (Government Of Japan) अलीकडील मार्गदर्शक सूचनांनंतर हे पाऊल उचलले आहे. यामुळे कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांना चार दिवसांच्या वैकल्पिक सुट्टीसाठी प्रोत्साहित करण्यास सांगितले आहे.

Panasonic

यानुसार सरकारचे म्हणणे आहे की, अतिरिक्त सुट्टीच्या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांची, पालकांची, कुटुंबातील कोणत्याही वृद्ध व्यक्तीची काळजी घेण्यासाठी किंवा काही वैयक्तिक काम करण्यासाठी असणार आहे.

Japan

आठवड्यातून 3 दिवस सुट्ट्या;

जपान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पॅनासॉनिक कंपनीकडून सांगितलं गेल आहे की, आठवड्यातून 3 दिवस सुट्टी घेण्याचा पर्याय सध्या ट्रायल बेसवर सुरु आहे. जपानमध्ये Hitachi, Mizuho Financial Group, Fast Retailing, Uniqlo सारख्या कंपन्या पानोसॉनिकच्या आधीपासूनच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दिन दिवस सुट्ट्या ऑफर करत आहे.

याबाबत रिक्रूट वर्क्स इन्स्टिट्यूटचे (Recruit Works Institute) वरिष्ठ संशोधक हिरोमी मुराता (Hiromi Murata) यांनी सांगितले की, कंपन्यांना शॉर्ट वर्क वीक (Short Work Week) योजनेद्वारे कर्मचाऱ्यांना व्यस्त ठेवायचे आहे. कारण कंपन्यांच्या मते, नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी जास्त वेळ लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT