Parliament Winter Session Saam Tv
देश विदेश

Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला 7 डिसेंबरपासून सुरूवात

संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत होणार

वृत्तसंस्था

शिवाजी काळे

नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) यंदा 7 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अशी माहिती संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान 23 दिवसांत 17 बैठका होणार आहेत. देशाच्या अमृत काळात अधिवेशनादरम्यान विधिमंडळ कामकाज आणि इतर बाबींवर चर्चेची अपेक्षा आहे. या दरम्यान सर्वपक्षीय संसदीय सदस्यांकडून विधायक चर्चेची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हे पहिलेच अधिवेशन असेल जेव्हा उपाध्यक्ष जगदीप धनखर राज्यसभेचे कामकाज चालवतील. सरकार आगामी अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्याचा विचार करत असताना, विरोधक अनेक विषयांवर चर्चेची मागणी करणार आहेत.

निवडणुकीच्या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन

गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या काळात संसदेचेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान झाले, तर गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

राहुल गांधी हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यावेळी हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यावेळी हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निश्चित वेळापत्रकानुसार 150 व्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT