सर्पदंश झाल्यानंतर सरकारी रुग्णालयातच उपचारासाठी बोलवला मांत्रिक अन्...
सर्पदंश झाल्यानंतर सरकारी रुग्णालयातच उपचारासाठी बोलवला मांत्रिक अन्... Saam TV
देश विदेश

सर्पदंश झाल्यानंतर सरकारी रुग्णालयातच उपचारासाठी बोलवला मांत्रिक अन्...

वृत्तसंस्था

सुपौल: एका सरकारी हॅास्पिटलमध्ये साप चावल्यानंतर उपचार घेत असलेल्या युवकावर सलाईन सावलेल्या अवस्थेत मांत्रिकाकडून तंत्रमंत्र वापरुन उपचार सुरु होते. मांत्रिकाच्या मंत्रानेही युवकाला काही फायदा झाला नाही. तेव्हा कुटुंबाने डॅाक्टरांच्या समोर हात पसरले. बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील ही घटना आहे. ज्याठिकाणी आजही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोकांकडून सरकरी हॅास्पिटलमध्ये तंत्रामंत्राचा वापर केला जात असल्याने एकच खळबळ माजली आहे.

हॅास्पिटलमधील या प्रकाराची सध्या जिल्हाभरात चर्चा सुरु आहे. तंत्रमंत्रावेळी स्थानिक युवक संजीत कुमार याला धमकी देताना पाहायला मिळत आहे. कुटुंबीयांनी डॅाक्टरांऐवजी मांत्रिकाकडे जात असल्याने अंधविश्वासाचा बाजार झालेला पाहायला मिळत आहे. एका युवकाचा सुपौल येथे सापाने चावा घेतला त्यानंतर त्याला लगेच हॅास्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्याला सलाईन लावण्यात आले. परंतु तरुणाच्या कुटुंबीयांनी एका मांत्रिकाला हॅास्पिटलमध्ये बोलावले आणि मुलावर अघोरी कृत्य सुरु केले. तरुण हॅास्पिटल बाहेर सलाईन लावलेल्या अवस्थेत आल्या मुळे एकच खळबळ उडाली.

मांत्रिक जवळपास एक तास भोंदूगिरी करत होता. मांत्रिकाच्या तंत्रामंत्रानी युवकावर काहीत फरक नाही पडला नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी पुन्हा डॅाक्टरकडे धाव घेतली. तेव्हा डॅाक्टरांनी उपचार करायला सुरुवात केला आणि धोका टळला. यावेळी उपचार करणाऱ्या डॅाक्टरांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT