government will give you free flats Saam Tv News
देश विदेश

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Viral Video : आता बातमी आहे एका व्हायरल मेसेजची...तुम्हाला आता सरकार मोफत फ्लॅट देणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Prashant Patil

संदीप चव्हाण, साम टिव्ही

सरकार आता मोफत फ्लॅट देणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...सरकारी फ्लॅट मिळवायचा असेल तर एका लिंकवर जाऊन कागदपत्रं जमा करायचे आहेत असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का...? सरकार आता लोकांना फ्लॅट देणार आहे का...? सरकार म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून घर देतं...मात्र, आता सरकार मोफत फ्लॅट देणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय...? त्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

सरकारी फ्लॅट मिळवण्यासाठीच्या यादीत तुमचे नाव आहे का? सरकारने एक नवीन यादी जारी केलीय.आता तुम्ही सरकारी योजनेअंतर्गत नवीन फ्लॅट मिळवू शकता. सरकारी फ्लॅट मिळवण्याची संधी गमावू नका.

हा मेसेज व्हायरल झाल्याने अनेक जण संभ्रमात आहेत...खरंच सरकारची अशी योजना आहे का...? याची माहिती आमच्या प्रेक्षकांना देण्यासाठी व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली...सर्वात प्रथम आम्ही व्हायरल मेसेजमधील वेबसाईट पाहिली...तसंच सरकारकडून या योजनेबाबत माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य; साम इन्व्हिस्टिगेशन

सरकारची फ्री फ्लॅट योजना नाही

पोस्टमध्ये योजना, कोणत्याही राज्याचं नाव नाही

'sarkariflatindia1.today' वेबसाईट लिंक बनावट

सरकारी वेबसाईट्समध्ये शेवटी .gov.in असं असतं

वेबसाईटच्या माध्यमातून कागदपत्रं मिळवली जातात

व्हायरल डॉक्यूमेंट प्रॉपर्टीच्या लिलावाचे आहेत...खोट्या वेबसाईट तयार करून लोकांची दिशाभूल केली जातेय...सरकारच्या नावाने मेसेज व्हायरल होत असल्याने घरासाठी काहींनी कागदपत्र वेबसाईटवर जमा केलेयत...मात्र, यातून तुमची फसवणूक होऊ शकते...त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार तुम्हाला घर देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT