खळबळजनक! ड्रग्ससाठी बापाने चक्क मुलाला विकलं Saam Tv
देश विदेश

खळबळजनक! ड्रग्ससाठी बापाने चक्क मुलाला विकलं

आसाम मधील मोरीगन जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आसाम : आसाम Assam मधील मोरीगन Morrigan जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्रग्ससाठी drugs एका बापाने आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला ४० हजारांना विकल्याचे उघड झाले आहे. गुवाहाटी पासून ८० किमी दूर असलेल्या लहरीघाट Lahari Ghat या गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुलाच्या आईने पोलिसात Police याबद्दल तक्रार दिल्यानंतर हा खुलासा झाला आहे. आरोपी अमीनुल इस्लामने आपल्या मुलाला साजिदा बेगम नावाच्या व्यक्तीला विकले होते. पोलिसांना या प्रकरणाची तक्रार मिळताच त्यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि अमीनुल इस्लाम आणि साजिदा बेगम या दोघांना अटक Arrested करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

मुलाची आई रुक्मिना बेगम नवऱ्याच्या जाचाला कंटाळून, आपल्या माहेरी राहत होती. ड्रग्सच्या सेवनावरून त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत असत. त्यामुळे तिने आपल्या वडिलांकडे राहण्याचा निर्णय हाती घेतला होता. एक दिवस आरोपी अमीनुल तिच्या घरी आला आणि मुलाचे आधारकार्ड बनवायचे आहे, असे सांगून घेऊन त्याला तो गेला.

मात्र २- ३ दिवस मुलाला परत पाठवले नसल्यामुळे रुक्मिनाला त्याच्याबद्दल संशय आला. यानंतर मुलाला विकल्याच्या बातमीने तिला मोठा धक्काच बसला आहे. अखेर ५ ऑगस्ट दिवशी तिने पोलिसात तक्रार दिली आहे. मुलाला ताब्यात घेतले आहे. या बाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. तक्रारदार अमीनुलने दिलेल्या माहितीनुसार, मोरीगावच्या लहरीघाट गावात साजिदा बेगमला मुलगा विकल्याचे सांगितले आहे.

ड्रग्स विकत घेण्याकरिता ४० हजारांना विकले आहे. याप्रकरणी आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यावर आम्ही करत मुलाला साजिदाच्या ताब्यामधून सोडवले आहे, आणि आईकडे सोपवले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी ड्रग्स घेणे आणि विकण्यासोबतच सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संपूर्ण विधानसभा बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

Daily walking benefits: तुमच्या वयोमानानुसार किती दररोज किती मिनिटं पायी चाललं पाहिजे?

Maharashtra News Live Update: जळगावातील कासोदा येथे कृषी विभागाची मोठी कारवाई; प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त

पीएम किसान योजनेतून तुमचं नाव वगळलंय का? 23 वा हप्ता येण्याआधी असं करा चेक

SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

SCROLL FOR NEXT