500 रुपयासाठी मोठ्या भावाने केली छोट्या भावाची हत्या  Saam Tv
देश विदेश

500 रुपयासाठी मोठ्या भावाने केली छोट्या भावाची हत्या

बिहारच्या कैमूर येथे मोठ्या भावाने लहान भावाला धक्कादायक शिक्षा दिली आहे. ही शिक्षा इतकी भयानक होती की यात लहान भावाचा मृत्यू झाला.

वृत्तसंस्था

बिहारच्या कैमूर येथे मोठ्या भावाने लहान भावाला धक्कादायक शिक्षा दिली आहे. ही शिक्षा इतकी भयानक होती की यात लहान भावाचा मृत्यू झाला. आरोपी लहान भावाकडे त्याला दिलेले 500 रुपये मागत होता. मात्र, लहान भावाने ते देण्यास नकार दर्शवला. यावर, मोठ्या भाऊ खूप संतापला आणि त्याने दांड्याने लहान भावाला मारायला सुरुवात केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, मारण्याच्या नादात लहान भावाचा मृत्यू कधी झाला, हे मोठ्या भावाला कळले देखील नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

कैमूर जिल्ह्यातील सोंधी गावात राहणारा रामू मजुरीचे काम करतो. त्याने सांगितले, की त्याचा लहान भाऊ काहीच काम करत नव्हता. त्याला नशा करण्याची सवय होती. बऱ्याचवेळा सांगूनही त्याच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. आरोपीने सांगितले, की त्याने लहान भावाला 500 रुपये दिले होते.

परंतू नंतर मोठा भाऊ मागायला लागला तर लहान भावाने पैसे द्यायला नकार दिला. नंतर त्याने लहान भावाला इतकी बेदम मारहाण केली की लहान भावाचा जागिच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर पोलीसही घटनास्थळी आले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आणि आरोपी मोठ्या भावालाही अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT