Russia Ukraine War: कीव्ह शहराला वेढा; सॅटेलाइटच्या फोटोमध्ये दिसली युक्रेनची भयानक स्थिती Saam Tv
देश विदेश

Russia Ukraine War: कीव्ह शहराला वेढा; सॅटेलाइटच्या फोटोमध्ये दिसली युक्रेनची भयानक स्थिती

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला ५ दिवस पूर्ण झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला ५ दिवस पूर्ण झाले आहेत. या ५ दिवसांत रशियन (Russian) फौजांनी युक्रेनवर जोरदार हल्ला चढविला आहे. रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियन हल्ल्यामध्ये (attack) युक्रेनकडून (Ukraine) जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. युद्ध सुरू असतानाच सॅटेलाइट (satellite) छायाचित्र समोर आले आहे. राजधानी कीव्हमध्ये (Kiev) शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन फौजा यामध्ये दिसून येत आहे.

हे देखील पहा-

सॅटेलाइट फोटोनुसार, युक्रेनच्या सैन्याला रशियाने वेढले असल्याचे दिसून येत आहे. रशियन फौजांची एक तुकडी कीव्हच्या दिशेने उचलबांगडी करत आहे. रविवारी मॅक्सार टेक्नोलॉजीच्या माध्यमातून दिसून आलेल्या सॅटेलाइटमध्ये कमीत- कमी १०० लष्करी (Military) वाहनांचा ताफा दिसून आला आहे. हा लष्करी वाहनांचा ताफा कीव्ह बाहेर असलेल्या एंटोनोव्ह विमानतळाच्या उत्तरेपासून जवळपास २० मैल आणि शहराच्या सीमेपासून ३० मैल दूर अंतरावर आहे. सॅटेलाइट फोटोनुसार, रशियाची लष्करी वाहने जवळपास १७ मैलपर्यंत अंतरापर्यंत होती. सॅटेलाइट फोटोमध्ये या वाहनांचा ताफा पूर्णपणे दिसून आलेला नाही.

रशियन सैनिकांनी युक्रेनच्या अनेक ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. कीव्हच्या दिशेने ते आगेकूच करत आहेत. रशियन सैन्याच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये अनेक रणगाडे असून शस्त्रे असलेले ट्रक, आणि लढाऊ वाहने आहेत. हे रशियन लष्कर कीव्हपासून फक्त २५ किलोमीटर दूर अंतरावर आहे. शिवाय, या फोटोमध्ये एक तुटलेला पूल दिसत असून हल्ल्यामध्ये नष्ट झालेली वाहने देखील दिसून येत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT