घृणास्पद कृत्य! दफन केलेल्या मित्राचा मृतदेह बाहेर काढून शहरभर फिरवला; कारण... Saam Tv
देश विदेश

घृणास्पद कृत्य! दफन केलेल्या मित्राचा मृतदेह बाहेर काढून शहरभर फिरवला; कारण...

मृतदेह चक्क दफनभूमीतून खोदून बाहेर काढण्यात आला

वृत्तसंस्था

क्वीटो – जगात सर्वात घट्ट नातं म्हणजे मैत्रीचं. अलीकडेच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका मित्राचा मृतदेह दुसरे मित्र बाईकवरुन शहरभर फिरवत आहेत असल्याचे दिसून येत आहे. हा मृतदेह चक्क दफनभूमीतून खोदून बाहेर काढण्यात आला आहे. मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह शवपेटीतून बाहेर काढण्याची परवानगी त्याच्या आई वडिलांनी दिली होती असा मृत व्यक्तीच्या मित्रांचा दावा आहे. मृतदेहाला बाईकवर बसवून बिनधास्त बाईक राईड करताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

हे देखील पहा -

प्राप्त महतीनुसार, हे युवक त्यांच्या मित्राला श्रद्धांजली देऊ इच्छित होते. ही त्यांच्या मृत्यू झालेल्या मित्राची इच्छा होती आणि याच प्रकारे मित्रांनी त्याला अखेरचा निरोप दिला. त्याच्या शवपेटीवर दारु शिंपडण्यात आले. मागील आठवड्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. जेव्हा त्याच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात होता तेव्हा कुणीतरी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याचा मृत्यू झाला. तो २१ वर्षाचा होता.

या घटनेबाबद पोलीस म्हणाले की, शहरात पहिल्यांदाच असे काही घडले आहे. ही चुकीची पद्धत आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. या घटनेचा तपासही सुरु केला नाही. अंत्यसंस्कार एक खासगी कार्यक्रम मानला जातो आणि या घटनेविरोधात पोलिसांकडे कोणीही तक्रार केलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT