अरे बापरे! चिमुकल्यानं गिळला बल्ब, मात्र.... Saam Tv
देश विदेश

अरे बापरे! चिमुकल्यानं गिळला बल्ब, मात्र....

एका ६ महिन्याच्या मुलीने बल्ब गिळल्यावर तिच्या जिवाला असणारा धोका कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आता टळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : एका ६ महिन्याच्या मुलीने बल्ब गिळल्यावर तिच्या जिवाला असणारा धोका कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आता टळला आहे. एका ६ वर्षांच्या बाळाने खेळता- खेळता चक्क बल्बच तोंडाच्या आत घातला आहे. हा बल्ब तिच्या घशात अडकून बसल्यावर तिला त्रास होऊ लागला. अगोदर घरच्यांनी तो बल्ब बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामध्ये त्यांना यश येत नव्हते. मग त्यांनी असा निर्णय घेतला, ज्यामुळे मुलीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

झारखंड मधील पलामू भागात एका ६ महिन्याच्या मुलीने खेळत असताना प्लॅस्टिकचा बल्ब पडलेला बघितला. त्याचा रंग आकर्षक वाटल्याने ती रांगत- खेळत त्याच्या जवळ गेली. तो बल्ब उचलून तिने तोंडात घातला आणि खाऊ लागली होती. यामुळे बल्ब तिच्या घशात गेला आणि अडकून बसला होता.

हे देखील पहा-

घशात खुपच मोठ्या प्रमाणात वेदना होताना मुलगी रडू लागली. कुटुंबीय मुलीच्या जवळ धावत आले आणि नेमका प्रकार त्यांच्या लक्षामध्ये आला. सुरुवातीला घरच्या मंडळींनी मुलीच्या घशातील बल्ब काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो इतक्या विचित्र प्रकारे अडकला होता की तो काढता येत नव्हता. मुलीच्या वेदना वाढत होते आणि तिचा श्वास देखील गुदमरायला सुरवात झाली होती.

यामुळे तिच्या पालकांनी मुलाला तातडीने हुसैनबादच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या डॉ. विकास कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलीच्या घशातून हळुवारपणे बल्ब बाहेर काढला आणि मुलीची सुटका त्यातून झाली. हा बल्ब जवळपास २ इंच लांब होता. ते बघून सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

साधारणतः गंभीर प्रकरणांमध्ये खासगी हॉस्पिटलात रुग्णाला नेण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न राहत असतो. मात्र, सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलीचे प्राण वाचल्याने यापुढे आपण कोणत्याही आजारावर उपचाराकरिता इथेच येणार असल्याचा निर्धार मुलीच्या कुटुंबीयान कडून करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT