Hafiz Saeed Saam Tv
देश विदेश

Hafiz Saeeds Son: पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एंट्री; हाफिज सईदचा मुलगा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Pakistan Elections: पाकिस्तान मुस्लीम लीग-एन (पीएमएमल-एन) चा तारीक फझल चौधरी, इस्लामाबादचे माजी महापौर पीर आदिल गिलानी, शेख अन्सार अजीज, संघीय राजधानीचे माजी उपमहापौर झीशान नक्वी आणि चौधरी रिफत जावेद यांच्यासह अनेक नेत्यांनी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Bharat Jadhav

Hafiz Saeeds son Contest In Election :

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद पाकिस्तानमधील निवडणुकीत उतरणार आहे. लाहोरच्या NA-127 जागेवरून निवडणूक लढवत असल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत हाफिज सईदच्या नवीन राजकीय संघटनेने आपले उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. (Latest News)

दहशतवादी संघटना (Terrorist organization) , लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) (LeT) चा संस्थापक हाफिज सईद (Hafiz Saeed) हा २०१९ पासून तुरुंगात आहे. प्रतिबंधित करण्यात आलेली जमात-उद-दावा (JuD) शी संबंधित दहशतवादी संघटनेला पैसा दिल्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सईदला अटक करण्यात आलीय. दरम्यान पाकिस्तानात (Pakistan) सईदने मरकजी मुस्लीम लीग नावाची एक राजकीय पक्ष स्थापन केला केलाय. या पक्षाचं चिन्ह कुर्सी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीएमएमलचे अध्यक्ष खालिद मसूद सिंधू यानी एका व्हिडिओतून आपल्या समर्थकांना संदेश देताना म्हणाले की, त्याचा पक्ष राज्यात आणि देशातील निवडणुकीत आपले उमेदवार उभे करत आहे. आम्हाला सत्तेत भ्रष्टाचारासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी यायचं आहे.पाकिस्तानला इस्लामिक कल्याणकारी राज्य बनवायचे आहे." असा संदेश त्यांनी आपल्या व्हिडिओतून दिलाय. सिंधू एनए १३० लाहोरचे उमेदवार आहेत. या जागेवरून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ देखील निवडणूक लढवत आहेत.

सिंधूने आपल्या पक्षाचा सईदच्या संघटनेशी संबंध नसल्याचं सिंधूने म्हटलंय. २०१८ मध्ये मिल्ली मुस्लिम लीग (MML) हा जमात-उद-दावाचा राजकीय पक्ष होता. दरम्यान संयुक्त राष्ट्राने हाफिज सईदला दहशतवादी घोषित केलं असून त्याच्यावर १ कोटी डॉलरचं बक्षीस ठेवलंय. MMLवर बंदी घातल्यामुळे २०२४ च्या निवडणुकीसाठी PMML ची स्थापना करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT