Japan Earthquake Photos Saam TV
देश विदेश

Japan Earthquake: जपानमध्ये विनाशकारी भूकंप; रस्त्यांना भगदाड अन् हजारो घरांची पडझड, अंगावर काटा आणणारे PHOTO

Japan Earthquake Photos: सोमवारी जपानला भूकंपाचे एकापाठोपाठ एक तब्बल १५५ धक्के बसले. या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Satish Daud
Japan Earthquake Photos

वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी जपानला भूकंपाचे एकापाठोपाठ एक तब्बल १५५ धक्के बसले.

Japan Earthquake Photos

या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही शेकडो लोक बेपत्ता असून बचावपथकाकडून त्यांच्या शोध घेतला जातोय.

Japan Earthquake Photos

जपानमध्ये आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ इतकी मोजली गेली.

Japan Earthquake Photos

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी जपान हादरून गेला. अनेक शहरातील रस्त्यांवर भेगा पडल्या तर काही ठिकाणी विजेचे खांब देखील उन्मळून पडले.

Japan Earthquake Photos

भूकंपामुळे हजारो घरांची पडझड झाली, तसेच काही घरांना आगही लागली. भूकंपानंतर झालेल्या पडझडीमुळे अनेक नागरिक राडारोड्याखाली अडकल्याचे दिसून आले.

Japan Earthquake Photos

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वाजिमा शहरांत भूकंपाचे मुख्य केंद्र होतं. तर, १९ जणांना कार्डिअॅक अटॅक आल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिली.

Japan Earthquake Photos

भूकंपामुळे इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या. 32 हजारांहून अधिक घरांची वीज गेली आहे.

Japan Earthquake Photos

भूकंपानंतर हवामान विभागाने याठिकाणी त्सुनामीचा इशाला दिला आहे. त्यामुळे किनारपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT