Terrible Accident News, Pune Latest Marathi News Saam Tv
देश विदेश

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

साम टीव्ही ब्युरो

उत्तर प्रदेश: यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident) एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील (family) ५ जणांवर काळाचा घाला पडला आहे. मृत व्यक्ती पुण्यातील (Pune) रहिवासी आहेत. हा अपघात (accident) इतका भीषण होता की, जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात जीपमधील एक पुरुष, चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. (Pune Latest Marathi News)

हे देखील पाहा-

यमुना एक्स्प्रेस वेवरून (Yamuna Expressway) ते नोएडाकडे जात असताना हा अपघात झाला आहे. या घटनेत अपघातग्रस्तांची ओळख त्यांच्या आधारकार्डवरून पटली आहे. या एक्सप्रेस वेवर अपघाताच्या मालिका सुरूच आहेत. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

गेल्या आठवड्यात देखील यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident) एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व लोक हरदोई येथून नोएडा येथे एका लग्नाला जात होते. त्यावेळी कॉल रायडर्स माइलस्टोन ६८ जवळ गाडी पोहोचली असता, एका अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT