Kannauj Accident google
देश विदेश

Kannauj Accident: कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! डिव्हायडर तोडून कार ट्रकला धडकली; पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू

Kannauj Accident News: कन्नौजमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

Dhanshri Shintre

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात एक मोठा भीषण अपघात झाला आहे. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. एका वेगवान कारचे नियंत्रण सुटले आणि ती कार डिव्हायडर तोडून पलीकडे असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात सैफई वैद्यकीय विद्यापीठाच्या पाच डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा लखनौ एक्स्प्रेसवेवर पहाटे ३.३० च्या सुमारास १९६ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. या अपघातात सैफई वैद्यकीय विद्यापीठाच्या पाच डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात बळी पडलेले सर्व डॉक्टर लखनौ येथील एका लग्न समारंभातून परतत होते.

पहाटे ३.४३ वाजता नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेच्या किलोमीटर क्रमांक 196 वर अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्कॉर्पिओ कार आग्र्याला जात होती, झोपेमुळे गाडी डिव्हायडर तोडून आग्रा ते लखनौच्या दिशेने पोहोचली. यानंतर आग्राला बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात पवन कुमार वर्मा यांचा मुलगा अनिरुद्ध वर्मा, राधा विहार एक्स्टेंशन कमला नगर आग्रा, यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातात जखमी झालेल्या डॉ.जयवीर सिंग यांना सैफई मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले आहे.

या अपघातात डॉ.अनिरुद्ध वर्मा, डॉ.संतोष कुमार मौर्य, डॉ.अरुण कुमार, डॉ.नरदेव या चार डॉक्टरांचा मृत्यू आणि बुद्ध विहार, मुरादाबाद येथील करण सिंह यांचा मुलगा जयवीर सिंग हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील डॉ भीम राव आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सीपी पाल यांनी सांगितले की, आज पहाटे ५ जणांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यांना मृत घोषित करण्यात आले. यातील ४ जणांची ओळखपत्रे सापडली असून, हे सर्व डॉक्टर आहेत. मृतांची ओळख पटली असून कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. एक डॉक्टर कन्नौजचा रहिवासी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT