Viral Saam Tv News
देश विदेश

Viral News: ह्रदयद्रावक! कन्यादानानंतर बापाने सोडले प्राण, ह्रदयविकाराच्या झटक्यानं झालं निधन

Emotional wedding moment turns tragic: लेकीच्या लग्नसोहळ्यात वडिलांनी सोडले प्राण. कन्यादान केल्यानंतर आला ह्रदयविकाराचा झटका. जागीच झाला मृत्यू.

Bhagyashree Kamble

बाप आणि लेकीचं नातं निखळ तसेच खास असते. तळाहाताच्या फोडाप्रमाणे बाप आपल्या मुलीला जपतो. तिला मोठं करतो. जीवापाड प्रेम, माया देतो आणि काळजावर दगड ठेवत लेकीचं लग्न लावून सासरी धाडतो. पण एका लग्न सोहळ्यात धक्कादायक घटना घडली आहे.

लेकीच्या लग्नात कन्यादान केल्यानंतर लगेचच वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांचा लेकीच्या लग्नातच जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना तेलंगणातील कामारेड्डी येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कामारेड्डी जिल्ह्यात सर्वांना धक्का बसेल अशी एक घटना घडली आहे. शुक्रवारी भिकनूर मंडळातील जंगमपल्ली गावात एक लग्न सोहळा पार पडत होता. एका वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात लावले होते. पण कन्यादानानंतर वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला. लग्नातील आनंदाचं वातावरण अचानक दुखा:त बदललं. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कन्यादानानंतर वडील अचानक खाली कोसळले

रामेश्वरपल्ली गावातील रहिवासी ५६ वर्षीय कुडिक्याला बालचंद्रम असं मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांची मोठी मुलगी कनका महालक्ष्मी हीचं लग्न होतं. तिच्या लग्नसोहळ्यात बालचंद्रम आनंदित होते. कुटुंबात देखील आनंदाचं वातावरण होतं. लग्नाचे विधी सुरू होते. कन्यादान करण्यात येत होतं. मात्र, अचानक एक धक्कादायक घटना घडली. कन्यादान केल्यानंतर वडिलांच्या अचानक छातीत दुखू लागलं.

कुडिक्याला बालचंद्रम लगेच जमिनीवर कोसळले. हे पाहुन लग्नात उपस्थित असलेले नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य घाबरले. त्यांना ताबडतोब रूग्णालयात नेण्यात आलं. परंतू तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानं झालं असल्याचं सांगितलं. हे ऐकूण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT