k chandrashekar rao News saam tv
देश विदेश

के. चंद्रशेखर राव यांनी घेतली नितीश कुमारांची भेट; विरोधी पक्षांनी आखली भाजप विरुद्ध नवी रणनीती ?

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Vishal Gangurde

k chandrashekar rao News : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर विरोधकांनी देखील भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रोखण्यासाठी रणनीती आखली आहे. याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारची भेट घेतली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना के. चंद्रशेखर राव म्हणाले, 'गेल्या आठ वर्षापासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांच्या या कार्यकाळात देशातील सर्वच क्षेत्राची अधोगती होत आहे. मोदी यांना अनेक जण वैतागले आहेत. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानेही सर्वात निचांकी स्तर गाठला आहे. अनेक उद्योगपती देश सोडून जात आहेत'

के. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले, 'देशातील नागरीकांना आजही वीज आणि पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महागाईमुळे डिझेल-पेट्रोल अन्य खाद्य पदार्थांचे दरही वाढले आहेत. केंद्राच्या अपयशामुळे देशाचे नुकसान होत आहे. विकासाचे नाव केवळ घोषणाबाजी आहे'.

'नरेंद्र मोदी यांनी २०२० पर्यंत प्रत्येक गरीब व्यक्तीचे स्वत:चं घर असेल असे म्हणाले होते. आता देशात सर्वांना घरे मिळाली आहेत का ? शेतकऱ्यांचं उत्पन्नातात वाढ झाली का ? 'मुलगी शिकवा , मुलगी वाचवा' याचे काय झाले ? सध्या देशात धर्मावरून लोकांमध्ये फूट पाडली जात आहे', असेही के. चंद्रशेकर राव पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT