होमवर्क न केल्यानं मास्तरांनं मारलं लाथाबुक्क्यांनी! ; विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू Saam Tv
देश विदेश

होमवर्क न केल्यानं मास्तरांनं मारलं लाथाबुक्क्यांनी! ; विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

विद्यार्थ्यंनी शाळेचा अभ्यास केला नाही म्हणून त्यांना शिक्षक छडी मारतात. पण राजस्थानच्या चूरु जिल्ह्यात सालासरच्या कोलासर भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: विद्यार्थ्यंनी शाळेचा अभ्यास केला नाही म्हणून त्यांना शिक्षक छडी मारतात. पण राजस्थानच्या चूरु जिल्ह्यात सालासरच्या कोलासर भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी खासगी शाळेत 7 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षकाने अमानुष मारहाण केली अन् यामुळे मुलाचा मृत्यू झाला. मात्र होमवर्क केला नाही इतकाच याचा गुन्हा होता.

हे देखील पहा-

शाळेमध्ये होमवर्क न करता का आलास? म्हणून शिक्षकाचा राग अनावर झाला की त्याने त्याच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओमप्रकाश यांचा मुलगा गणेश खासगी शाळा मॉर्डन पब्लिक स्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिकतो.

तेव्हा वडील तातडीने शाळेत धावत;

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास गणेशचे वडील यांना शाळेतील शिक्षक मनोज यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, गणेश होमवर्क न करता वर्गात बसला होता. त्यामुळे त्याला मारलं. त्यात तो बेशुद्ध झाला आहे. तेव्हा वडील तातडीने शाळेत धावत आले. त्यांनी गणेशला पाहिले तेव्हा हा बेशुद्ध झाला आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? असा सवाल आरोपी शिक्षकाला विचारला. तेव्हा शिक्षकाने सांगितलं की तो मरण्याचं नाटक करत आहे. या घटनेमुळे शाळेतील बाकीचे मुलं खूप घाबरलेल्या अवस्थेत होती.

गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण;

यावर, वर्गातील मुलांनी सांगितले की, मनोजने गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जमिनीवर आपटून आपटून त्याला मारलं. तर जखमी अवस्थेत गणेशला सालासरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी गणेशला तपासून मृत घोषित केले. तक्रारीनुसार शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT