Dassault Rafale x
देश विदेश

Dassault Rafale : टाटा करणार राफेलची निर्मिती, संरक्षण क्षेत्रात भारत 'आत्मनिर्भर'

Tata: पाकिस्तानला सळो की पळो करून सोडणाऱ्या राफेल लढाऊ विमानांची भारतात टाटा कंपनीकडून निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे संरक्षण क्षेत्रात भारत 'आत्मनिर्भर' होणार आहे. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांना उद्धवस्त केलं. त्यामुळे राफेल विमानांची जगाला भुरळ पडली. ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल खरेदीसाठी जगातल्या प्रमुख देशांनी रांग लावली. आता या लढाऊ राफेल विमानाची भारतातच निर्मिती केली जाणार आहे आणि ती ही टाटा समुहाकडून.

टाटा आणि दसॉल्ट एव्हीएशन संयुक्तपणे राफेल विमानाचा फ्यूजलेज म्हणजे विमानाच्या मध्य भागाची निर्मिती करणार आहे. भारतात राफेलच्या फ्युजलेजमधील कोणत्या भागाची निर्मिती केली जाणार आहे पाहूयात...

भारतात आता राफेलची निर्मिती

- 2028 पर्यंत पहिल्या टप्प्यातली निर्मिती

- फ्युजलेज म्हणजे फ्रंट, मीड आणि इंजिन वगळता राफेलची संपूर्ण संरचना

- 15.27 मीटर लांब आणि 3 हजार किलोग्रॅम वजन

- महिन्याला दोन पूर्ण फ्युजलेज बनवणार

- फ्यूजलेजची रचना रडारपासून बचाव करण्यास सक्षम

चीन आणि पाकिस्तानसोबत भारताच्या संघर्षात राफेल लढाऊ विमानानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशात राफेलची निर्मिती भारतात होणार असल्यानं सरंक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणार आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्रांना भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर वाटचालीमुळे चांगलीच धडकी भरलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अलर्ट

Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Mobile Tips: तुमचा जुना फोन होईल अगदी नवीन, फॉलो करा 'हे' सोपे टिप्स

Nagpur News : बस अडवून खिडकीवर चढला, प्रवाशांना मारहाण; अर्धनग्न होत तरुणाचा भररस्त्यात राडा, शेवटी....

बिबट्या दबक्या पावलांनी शिरला गोठ्यात, शिकारीवर झडप टाकणार तेवढ्यात शेतकऱ्याने शिकवला धडा

SCROLL FOR NEXT