Cyrus Mistry died in car accident saam tv
देश विदेश

मोठी बातमी : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

पालघर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

नरेश शेंडे

पालघर : जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पालघरच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांचा दुर्देवी मृ्त्यू झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हा अधिक्षकांनी दिली आहे. मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सूर्य नदीच्या चारोटी येथील ब्रिजवर सायरस मिस्त्री यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात इतर दोन जणांचाही मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी संगितले आहे. सायरस मिस्त्री २०१९ मध्ये टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते. (Cyrus Mistry died in car accident)

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Cocktail 2 Collection : 'कॉकटेल २' फ्लॉप की हिट? रश्मिका-शाहिद-कृतीच्या 'लव्ह ट्रँगल'नं दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

ऑपरेशन टायर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

SCROLL FOR NEXT