Tamil Nadu News  Saam tv
देश विदेश

Tamil Nadu : सहलीला गेल्या पुन्हा परतल्याच नाही; नदीत बुडून 4 विद्यार्थिनींचा मृत्यू

तामिळनाडून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Vishal Gangurde

Tamil Nadu News : तामिळनाडून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सहलीसाठी प्रवासावर असलेल्या चार विद्यार्थिंनीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडूच्या कावेरी नदीत बुडून या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू राज्यातील पुडुकोट्टई जिल्ह्यातील विरलीमलाई येथील शासकीय माध्यमिक विद्यालयाची सहल निघाली होती. सहलीसाठी निघालेली बस कावेरी नदीजवळ थांबली. त्यामुळे बसमधील सर्व विद्यार्थी बस मधून उतरले. या बसमधील चार विद्यार्थिनी देखील उतरल्या. या विद्यार्थिंनींनी नदीजवळ जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी या विद्यार्थिंनीसोबत घात झाला.

सहलीसाठी प्रवासासाठी असलेल्या चार विद्यार्थिंनीचा कावेरी नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या चारही विद्यार्थिनी या तामिळनाडूतील (Tamil Nadu) शासकीय माध्यमिक विद्यालयातील आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी नोंद घेतली आहे. मुलीसंबोत हा अपघात (Accident) नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तामिळनाडूमधील चारही मृत विद्यार्थिनी राहत असलेल्या ठिकाणी एकच शांतता पसरली आहे. या विद्यार्थिनी नदीत बुडाल्याने त्यांचे मृतदेह आढळून येत नव्हते. मात्र, पोलिसांनी बराच वेळ शोधल्यानंतर चारही विद्यार्थिंनीचे मृतदेह हाती लागले आहेत. या चारही विद्यार्थिंनींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर विद्यार्थिनींच्या मृत्यूने शाळेवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच स्टॅलिन यांनी या घटनेतील मृत विद्यार्थिंनीच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT