Taliban: पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु Saam Tv
देश विदेश

Taliban: पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु

पंजशीर प्रांतावर ताबा मिळवण्याकरिता सर्व प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या तालिबानच्या मदतीला आता थेट पाकिस्तान उतरलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पंजशीर प्रांतावर ताबा मिळवण्याकरिता सर्व प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या तालिबानच्या मदतीला आता थेट पाकिस्तान उतरलेला आहे. पंजशीर खोऱ्यामध्ये पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोनद्वारे हवाई हल्ला करण्यात येत आहे. अफगाणिस्तानच्या सामंगन प्रांतातील माजी खासदार जिया अरियनजादो यांनी या बद्दलची माहिती दिली आहे. तर, दुसरीकडे तालिबान आणि रेझिस्टन्स फोर्स आपआपले दावे करत आहेत.

माजी खासदार जिया अरियनजादो यांनी म्हटले की, पंजशीर मध्ये पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोनच्या मदतीने हवाई हल्ला करण्यास सुरवात केली आहे. अरियनजादो यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचा अफगाणिस्तान मधील हस्तक्षेप उघड झाला आहे. रेझिस्टन्स फोर्सने ही ट्विट करून पाकिस्तानकडून तालिबानला मदत केली जात असल्याचे सांगितले आहे.

हे देखील पहा-

'सीएनएन न्यूज १८' ने सांगितलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान उघडपणे तालिबानची मदत करत आहे. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान कडून तालिबानला हवाई मदत दिली जात आहे. तालिबानच्या बाजूने लढण्याकरिता पाकिस्तानी लष्कराने आपले स्पेशल फोर्स पॅराशूटच्या माध्यमातून पंजशीर मध्ये उतरवले आहेत. दरम्यान, तालिबानने पंजशीर खोऱ्यावर नियंत्रण मिळवले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तर, पंजशीर मधील बंडखोरांनी हा दावा खोडून काढताना अद्याप देखील पंजशीरवर आपला ताबा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोमवारी पंजशीरमध्ये बंडखोरांनी तालिबानला शस्त्रसंधीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह हे अज्ञात स्थळी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. तर, अहमद मसूद गेल्या ३ दिवसांपासून ताजिकिस्तान मध्ये असल्याचे समजत आहे.

तालिबान बरोबर युद्धात बंडखोरांना मोठा फटका देखील बसला आहे. रेझिस्टन्स फोर्सचे प्रवक्ते आणि अहमद मसूद यांचे निकटवर्तीय समजले जाणारे फहीम दश्ती हे ठार झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. पंजशीर प्रांतामध्ये तालिबान मोठा हल्ला करण्याच्या तयारीला लागला आहे. हा हल्ला रोखावा, असे आवाहन अमरुल्ला सालेह यांनी संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय मुदायाला केले जात आहे.

पंजशीर प्रांतामध्ये तालिबान विरोधी फौजा संघर्ष करत आहेत. या प्रांतासह शेजारी असलेल्या बाघलान प्रांतातील ३ जिल्ह्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली आहे. यातून, सामान्य जनतेचे खूप हाल होत आहेत, असे त्यांनी या पत्रामध्ये सांगितले आहे. देशांतर्गत स्थलांतरित झालेले हजारो नागरिक हे पंजशीर खोऱ्यामध्ये आले आहेत. यामधून अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT