देश विदेश

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Surat Crime News: सुरतच्या पांडेसरा भागात फक्त ५० रुपयांच्या वादातून २३ वर्षीय बिट्टू सिंग अवधियाने मित्रांवर चाकू हल्ला केला. यात भगत सिंग ठार, अनिल राजभर गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.

Dhanshri Shintre

गुजरातमधील सुरत येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. बुधवारी रात्री पांडेसरा परिसरात फक्त ५० रुपयांच्या वादातून झालेल्या भांडणात एका २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत एक व्यक्ती ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिट्टू सिंग अवधिया या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्र तिरुपती सर्कलजवळील एका भोजनालयात जमले होते. याआधी ते अल्थन परिसरात गेले होते आणि वाढदिवसाच्या खर्चासाठी सर्वांनी एकत्र पैसे दिले होते. मात्र, जेव्हा ते भोजनालयात पोहोचले तेव्हा अनिल राजभर याने बिट्टूला दिलेले ५० रुपये परत मागितले आणि उत्सवात सहभागी होण्यास नकार दिला. एवढ्या छोट्या कारणावरून सुरू झालेला वाद झटपट तीव्र झाला.

वाद वाढत असताना अनिल आणि त्याचा मित्र भगतसिंग बिट्टूसोबत भिडले. या दरम्यान भगतसिंगने बिट्टूवर वाइपर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तो रॉड दुसऱ्या व्यक्तीला लागला. संतापलेल्या बिट्टूने तत्काळ चाकू काढून भगतसिंगच्या पाठीत वार केले. अनिलने मधे पडण्याचा प्रयत्न केला असता, बिट्टूच्या मित्र चंदन दुबेने त्याला धरून ठेवले. दरम्यान बिट्टूने चाकूने अनिलवर छाती आणि हातावर वार केले.

गंभीर जखमी भगतसिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर अनिल सध्या उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पांडेसरा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि काही तासांतच आरोपी बिट्टू सिंग अवधिया आणि त्याचा साथीदार चंदन दुबे यांना अटक करण्यात आली.

केवळ ५० रुपयांच्या किरकोळ वादातून झालेल्या या खूनप्रकरणामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून या घटनेबद्दल परिसरात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT