Rahul Gandhi Latest Update In Marathi Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi Bail: कॉंग्रेस नेते राहुल गांधींना दिलासा! सुरत सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, मात्र खासदारकी...

Rahul Gandhi Defamation Case: सुरतच्या कोर्टात जी आव्हान याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये प्रचारादरम्यान सगळे मोदी आडनावाचे लोक चोर असतात असं वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी त्यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची सुनावली होती. तर आज राहुल गांधी हे बहीण प्रियंकासह आणि तमाम काँग्रेस नेते सुरतमध्ये पोहचले होते. सुरतच्या कोर्टात जी आव्हान याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर ३० दिवसांची मुदत दिली होती. त्या तीस दिवसांच्या आत राहुल गांधी यांनी कोर्टात अपील करणं आवश्यक होतं. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. त्या सुनावणीत जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यात आली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल.

आता याबाबत नेमकं काय होईल ते १३ एप्रिलला समजू शकणार आहे. राहुल गांधी यांना फक्त जामीन मंजूर होऊन त्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही. मात्र दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय झाला तरच खासदारकी रद्द होण्याची जी कारवाई होती त्यावर विचार होईल.

नेमके काय आहे प्रकरण...

हे संपूर्ण चार वर्षापूर्वीचे असून राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविले होते. ज्यामध्ये त्यांना असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT