Anil Deshmukh saam tv
देश विदेश

Anil Deshmukh : ईडीची याचिका फेटाळली; सर्वाेच्च न्यायालयातही अनिल देशमुखांना मिळाला दिलासा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयायने दिलासा मिळाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आज सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या जामीनाच्या निर्णयाच्या विराेधात ईडीनं सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली हाेती. आज सर्वाेच्च न्यायालयानं या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. (Breaking Marathi News)

गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या अनिल देशमुख यांनी वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयास मागितली होती. त्यांची ही मागणी मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केली हाेती. त्यानूसार जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

दरम्यान या निर्णायाच्या विराेधात ईडीनं सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. सर्वाेच्च न्यायालयाने मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालावर हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अनिल देशमुख यांना आज दिलासा मिळाला आहे. सीबीआय प्रकरणात सुनावणी प्रलंबित असल्याने अनिल देशमुख अजून तुरुंगात आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT