SUPREME COURT VEHICLE LOAN VERDICT saam tv
देश विदेश

हप्ता थकल्यावर आता फायनान्स कंपनीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court Rules On Vehicle Seizure After Loan EMI Default: वाहन कर्जाचा हप्ता थकल्यानंतर फायनान्स कंपनी किंवा बँकेला मनमानी पद्धतीने वाहन जप्त करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने वाहन जप्ती, रिकव्हरी एजंट आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.

Omkar Sonawane

वाहन कर्जाचा हप्ता थकल्यानंतर बँक किंवा फायनान्स कंपनीला मनमानी पद्धतीने वाहन ताब्यात घेता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. वाहन जप्त करण्यासाठी कर्ज करारातील अटी आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. कर्जाचा हप्ता थकल्यानंतर संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनीला वाहनाचा ताबा घेण्याचा अधिकार काही परिस्थितीत असू शकतो. मात्र त्यासाठी कर्जदाराला योग्य पूर्वसूचना देणे आणि करारातील तसेच लागू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे बंधनकारक आहे.

विशेषतः रिकव्हरी एजंट्सकडून धमकी देणे, दबाव आणणे, फसवणूक करणे किंवा बळाचा वापर करून वाहन उचलणे, अशा पद्धतींवर सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला आहे. कर्जवसुली करताना नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निर्णयाचा अर्थ हप्ता थकल्यानंतर वाहन कधीही जप्त करता येणार नाही, असा नाही. कर्ज करारातील अटी, योग्य नोटिस आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाहनाचा ताबा घेण्याची कारवाई करता येऊ शकते. त्यामुळे वाहन कर्जाचा हप्ता थकलेल्या ग्राहकांनी रिकव्हरी एजंटकडून धमकी किंवा बळजबरीची कारवाई झाल्यास संबंधित कागदपत्रे आणि नोटिसा जपून ठेवणे महत्त्वाचे आहे.

कोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण

या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

कर्ज वसूल करण्याचा अधिकार करारांतर्गत असला तरी वसुलीसाठी बळाचा वापर घरात घुसून वासलुली चालणार नाही.

कोर्टाने चोला मंडलम कंपनीला याचिकाकर्त्याचे कर्ज खाते बंद करण्याचे, गाडी विकून मिळालेले 4 लाख 50 हजार रुपये 6% वार्षिक व्याजासह परत करण्याचे आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच 50 हजार रुपये खटल्याचा खर्च ही ठोठावला आहे.

RBI च्या मार्गदर्शन सूचना केवळ कागदावरच राहिल्या असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. बँका आणि NBFC नियमांचे पालन करत आहेत की नाही, हे बघण्याची जबाबदारी RBI ची असल्याचे कोर्टाने सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

Heart Attack : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

ऑनलाईन अन्नात आढळले जिवंत उंदीर अन् झुरळे; तुकाराम मुंढेंच्या FDA ची धाड, नामांकित स्टोअर्सचे परवाने रद्द

Healthy Lifestyle : मायक्रोवेव्ह की ओव्हन, जेवण कशामध्ये शिजवता? आरोग्यासाठी काय योग्य? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT