Supreme Court  Saam TV
देश विदेश

Supreme Court : मोदी सरकारला मोठा दिलासा; नोटबंदीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

नोटबंदीचा निर्णय योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं.

साम टिव्ही ब्युरो

Supreme Court Demonetisation Decision : २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.  (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये जनतेला संबोधित करत नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाद्वारे एका झटक्यात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या. या निर्णयानंतर देशभरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. नोटा बदलण्यासाठी नागरिकांना आपली कामे सोडून रांगेत उभे राहावे लागले होते. रांगेत उभे राहिल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त तेव्हा समोर आले होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात तब्बल ५८ याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर आज न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. या सुनावणीत खंडपीठाने मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे. हा निर्णय बदलता येणार नसल्याचंही कोर्टाकडून स्पष सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

SCROLL FOR NEXT