Suicide Saam Tv
देश विदेश

मोबाईल तुटल्याने 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं 'मला माफ करा'

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

वृत्तसंस्था

गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी दहावीच्या विद्यार्थिनीने तिचा मोबाईल तुटल्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबद घरात राहणाऱ्या भाडेकरूंनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांना विद्यार्थिनीने लिहलेली सुसाइड नोटही सोडली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे देखील पहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय पूजा ही मूळची बिहारची असून ती तिच्या आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत शिब्बनपुरा येथे राहत होती. पूजा ही दहावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील ई-रिक्षा चालवतात.

पूजाची आई आणि मोठी बहीण बिहारला गेल्याचे सांगण्यात आले, तर वडील ई-रिक्षा चालवायला गेले होते. पूजा घरात एकटीच होती. दुपारी तिने खोलीत पंख्याला गळफास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घरात राहणाऱ्या भाडेकरूंच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये मोबाईल तुटल्या लिहिले होते. तसेच मला क्षमा करा. मोबाईल तुटल्याने घरचे आपल्याला रागावतील आणि त्याच भीतीने तरुणीने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांचीही चौकशी सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

Arjun Tendulkar Wedding: 'मास्टर ब्लास्टर' होणार वरबाप; अर्जुन तेंडुलकर-सानियाच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची हजेरी, पाहा फोटो

Dhurandhar Actress : 'धुरंधर' गर्लवर बलात्काराचा प्रयत्न, स्पॉट बॉयचं काळं कृत्य सांगताना अभिनेत्रीचा संताप अनावर

Arjun Tendulkar Wedding : करोडपती आहेत अर्जुन तेंडुलकरच्या सासर कडचे, नेमका व्यवसाय काय करतात?

चंद्रग्रहणाचं सूतक ठरलं काळ! स्नानासाठी गेलेल्या ६ चिमुरड्यांचा वेदनादायी अंत; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT