ओमिक्रॉनच्या पार्श्ववभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कठोर निर्बंध  Saam Tv
देश विदेश

ओमिक्रॉनच्या पार्श्ववभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कठोर निर्बंध

याबाबत पश्चिम बंगालचे आरोग्य सचिव एच. के. त्रिवेदी यांनी माहिती दिली आहे.

वृत्तसंस्था

कोलकाता - देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. देशाची चिंता या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अजूनच वाढली आहे. देशात कोरोनाची वाढिती रुग्णसंख्या पाहता पश्चिम बंगाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पश्चिम बंगालचे आरोग्य सचिव एच. के. त्रिवेदी यांनी माहिती दिली आहे.

हे देखील पहा -

शाळा, महाविद्यालय, सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर, झू, पार्क हे सर्व बंद करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून (३ जानेवारी) करण्यात येणार आहे. तसेच सरकारी आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. तर सर्व बैठका ऑनलाइन घेण्याच्या सूचना जरी करण्यात आल्या आहेत.

दरम्यन, भारतात डिसेंबरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता १५,२५ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे २० रुग्ण आढळले असून ४ रुग्ण बरे झाले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर करणार

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT