Viral Video  Saam Tv
देश विदेश

स्मशानभूमीत अंत्यविधीवेळी डीजेवर तुफान डान्स, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर तुफान व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लग्न (marriage) समारंभात किंवा इतर कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी डीजेच्या तालावर नाचण्याची संधी कोणी देखील सोडत नाही. सोशल मीडियावर (Social media) तुम्ही अनेकवेळा असे व्हिडीओ (Video) बघितले असतील, ज्यामध्ये लोक तालावर नाचत असताना दिसून येत आहेत, पण तुम्ही कधी कुणाला शोकात नाचताना बघितलं आहे का? हे ऐकून तुम्हाला देखील नक्कीच आश्चर्य वाटणार आहे, पण नुकताच व्हायरल (Viral) झालेला हा व्हिडिओ बघून तुमचा देखील विश्वास बसणार आहे.

पाहा व्हिडिओ-

एखाद्याचा मृत्यू झाला की घरात शोककळा पसरते, प्रत्येकजण रडताना दिसतो, पण पूर्वी इंग्लंडमधील (England) बर्मिंगहॅममध्ये एक विचित्र दृश्य बघायला मिळाले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे, जो इंग्लंडच्या बर्मिंगहॅममधील विटन सेमेटरी, बर्मिंगहॅमचा आहे. जिथे कॅटी नावाच्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral) लोक आले होते. अगोदर महिलेला शवपेटीमध्ये ठेवून तेथे आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील पाहा-

यानंतर शांती सभेला हजेरी लावण्याकरिता आलेल्या कुटुंबातील (family) सदस्य आणि मित्रांनी शोक करण्याऐवजी तेथे पार्टी करण्यास सुरुवात केली आहे, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक स्मशानभूमीमध्ये डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत. कबरीभोवती नाचणाऱ्या या लोकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'birmzisgrime' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ बघून काहीजण आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी काहींनी लिहिले की, 'कॅटी कुठेही असेल, तिला असा डान्स बघून खूप आनंद होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT