Stop the Israel-Hamas War Resolutions passed at the United Nations General Assembly 120 countries supported Saam TV
देश विदेश

Israel-Hamas War: इस्रायल-हमासमधील युद्ध थांबावं; संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेत प्रस्ताव पास, भारताची भूमिका काय?

Israel-Hamas War Updates: इस्रायल-हमासमधील युद्ध थांबवं यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेत प्रस्ताव पास करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या बाजूनं 120 देशांनी मतदान केलं आहे.

Satish Daud

Israel-Hamas War Latest Updates

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. आतापर्यंत या युद्धात हजारो लोकांचा जीव गेला असून कित्येक लोक जखमी झाले आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, हे युद्ध थांबवं यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेत प्रस्ताव पास करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या बाजूनं 120 देशांनी मतदान केलं आहे. तर प्रस्तावाच्या विरोधात 14 देशांनी मतदान केलं आहे. भारतासह 45 देशांनी मात्र तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. 120 देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याने हा प्रस्ताव पास करण्यात आला आहे. पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल देशामधील युद्ध थांबवावं जेणेकरुन निर्दोष लोकांचा जीव जाणार नाही, असा या ठरावाचा उद्देश होता.

पॅलेस्टिनी संयुक्त राष्ट्र दूत रियाद मन्सूर यांनी पत्रकारांना सांगितले की गाझामधील युद्ध थांबविण्याची तीव्र गरज आहे. जेणेकरून मुले आणि नागरिकांच्या हत्या आणि हा विनाश थांबवता येईल. त्याचवेळी इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलाड एर्डन यांनी हा प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं आहे.

इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा आणि हमासच्या हल्ल्यांना तोंड देण्याचा अधिकार आहे, असं एर्डन यांनी म्हटलं. महासभेने दिलेला ठराव हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर दिली आहे.

७ ऑक्टोबरपासून सुरू आहे युद्ध

इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध 7 ऑक्टोबरपासून सुरू आहे. हमास या दहशतवादी संघटनेने सुरुवातीला इस्रायलवर हल्ला केला होता. यामध्ये अनेक लोक मारले गेले होते. याशिवाय हमासकडून शेकडो लोकांचे अपहरण देखील करण्यात आले. त्यानंतर इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली.

इस्रायलने गाझावर हवाई हल्ले सुरू केलेय पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की 7 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. दरम्यान, महासभेने "बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या सर्व नागरिकांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका" करण्याचे आवाहन केले. मजकुरात कुठेही हमासचे नाव दिलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT