Vande Bharat Train Inauguration Saam TV
देश विदेश

Vande Bharat Train: नागपूरहून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, चार दिवसांपूर्वीच ट्रेन सेवा सुरु

ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने यात प्रवाशांना कोणतीही दुखापती झाली नाही.

साम टिव्ही ब्युरो

Vande Bharat Train: वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये बुधवारी संध्याकाळी कुणीतरी ट्रेनवर दगडफेक केली. यात ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने यात प्रवाशांना कोणतीही दुखापती झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. चार दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या रायपूर विभागांतर्गत दुर्ग आणि भिलाई स्थानकांदरम्यान ट्रेन आली तेव्हा कोणीतरी दगडफेक केली. दगड ई-1 कोचच्या खिडकीवर लागल्याने थोडंफार नुकसान झालं आहे. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन नागपूरहून बिलासपूरकडे येत होती. (Railway)

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काही समाजकंटकांनी ही कृती केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. आरपीएफ अधिक तपास करत आहे. 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपुरात त्याचे लोकार्पण करण्यात आले.

ट्रेनचं भाडं किती?

IRCTC ने बिलासपूर ते नागपूर चेअर कारचे भाडे AC-II साठी 1,077 रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2,045 रुपये निश्चित केले आहे. ट्रेनमध्ये 16 डबे आहेत ज्यात 14 चेअर कार आणि 2 एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहेत. एकूण आसन क्षमता 1128 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

देशातील मोठ्या बँकेत महाघोटाळा! ७.४ कोटींच्या खऱ्या नोटा काढून ठेवल्या नकली नोटा; 'तो' कारनामा पाहून पोलीसही हादरले

High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

SCROLL FOR NEXT