Anand Mahindra Statement On Agneepath shceme  Saam TV
देश विदेश

'त्या' युवकांना आम्ही नोकरी देऊ; अग्निपथ योजनेसंदर्भात आनंद महिंद्रा यांचं मोठं वक्तव्य

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत अग्निपथ योजनेच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचारावर खेद व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केंद्र सरकारच्या अग्निपथ (Agneepath) लष्करी भरती योजनेला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. या योजनेच्या विरोधात अनेक तरुण रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातून या योजनेला विरोध केला जात असला तरी प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि यूपीयांमध्ये या योजनेला प्रचंड विरोध होत आहे. (Agneepath Military Recruitment Scheme)

ही योजना केवळ चार वर्षांची असून अशा पद्धतीने कंत्राटी भरती करुन या योजनेतील मुलांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या भविष्याचं काय होणारय़ असा सवाल उपस्थित केला जात आहे. या योजनेवरुन देशभरात गदारोळ सुरू असताना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट (Tweet) करत या त्यांनी योजनेच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचारावर खेद व्यक्त केला आहे. तसचं या योजनेतील प्रशिक्षित तरुणांना महिंद्रा ग्रुपतर्फे नोकरीची संधी देण्यात येईल असं देखील ते म्हणाले आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे मी अत्यंत दु:खी आणि निराश झालो आहे. मागील वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला जात होता तेव्हा मी म्हटले होते की, 'अग्निवीरांना मिळणारी शिस्त आणि कौशल्य त्याला नक्कीच रोजगारक्षम बनवेल आणि महिंद्रा ग्रुप (Mahindra Group) अशा प्रशिक्षित आणि सक्षम तरुणांना नोकरीची संधी देईल.' असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

दरम्यान, या योजनेला होणाऱ्या विरोधामुळे केंद्र सरकारने (Central Government) देखील या योजनेच्या वयोमर्यादेमध्ये बदल केला आहे. या योजनेसाठी वयोमर्यादा २१ वर्षे ठेवण्यात आली होती. मात्र, सरकारने या योजनेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेमध्ये वाढ केली असून आता ती २१ वर्षांवरून २३ वर्ष केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराची मुलगी मातोश्रीवर दाखल; पडद्यामागे काय घडतंय? VIDEO

प्रायव्हेट पार्टजवळ सतत खाज आणि जळजळ होतेय? मग 'हे' घरगुती 5 उपाय करून पाहा

Maharashtra News Live Update: रायगडच्या महाडमध्ये जोरदार पाऊस

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

SCROLL FOR NEXT