Sri Lanka Latest News Saam Tv
देश विदेश

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी; राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची घोषणा

श्रीलंकेत पुन्हा परिस्थिती बिघडली

वृत्तसंस्था

श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये मध्यरात्री १२ वाजल्यापासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी मध्यरात्रीपासून आणीबाणी जाहीर केली आहे. याआधीही श्रीलंकेत (Sri Lanka) 1 एप्रिल रोजी जनतेने निदर्शने केल्यानंतर आणीबाणी लागू करण्यात आली होती. ही आणीबाणी 5 एप्रिल रोजी मागे घेण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा आणीबाणी लागू करण्यात आली होती. आर्थिक संकटामुळे जनता रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात निदर्शनं करत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. संसद परिसराकडे जाणारा रस्ताही गुरुवारपासून बंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या होत्या. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राष्ट्रपतींनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई हे सध्या राष्ट्रपतींवर होत असलेल्या आरोपांचे मुख्य कारण आहे. श्रीलंकेतील परिस्थिती सध्या बिकट होत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलचाही मोठा तुटवडा असून खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त कागदाचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणेही सरकारसाठी आव्हानात्मक ठरत आहे. या सर्वांशिवाय चुकीच्या धोरणांमुळे श्रीलंका कर्जात बुडाला आहे. या कारणास्तव श्रीलंका स्वातंत्र्यानंतरचा सर्वात वाईट काळ पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT