EMI वर करता येणार हवाई प्रवास! Saam Tv
देश विदेश

खुशखबर! EMI वर करता येणार हवाई प्रवास!

या योजने अंतर्गत प्रवासी तीन, सहा किंवा बारा हप्त्यांमध्ये तिकिटांचे पैसे भरू शकता.

वृत्तसंस्था

मुंबई - विमानाने प्रवास करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता EMI वर हवाई प्रवास करता येणार आहे. प्रवाशांसाठी ही खास सुविधा स्पाइसजेटने उपलब्ध करून दिली आहे. तिकिटावर कोणतेही व्याज न आकारता EMI वर हवाई प्रवास करता येणार आहे. स्पाइसजेटने (s सोमवारी ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत प्रवासी तीन, सहा किंवा बारा हप्त्यांमध्ये तिकिटांचे पैसे भरू शकता.

हे देखील पहा -

या योजने अंतर्गत तीन महिन्यांच्या EMI चा पर्याय देण्यात आला आहे. एका प्रसिद्धीपत्रकात स्पाईसजेटने सांगितले आहे की, "या ऑफर अंतर्गत, ग्राहक कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तीन महिन्यांच्या EM चा पर्याय निवडू शकतात. यासाठी अर्जदाराला पॅन क्रमांक, आधार क्रमांक किंवा यांसारखे मूलभूत तपशील प्रदान करावे लागणार आहे. VID आणि पासवर्ड सह सत्यापित करावे लागेल. त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या UPI ID वरून पहिला EMI भरावा लागेल त्यानंतरचा आपोआप EMI त्याच UPI ID वरून कट केले जाणार आहे. यासाठी ग्राहकाला कोणतेही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड देण्याची आवश्यकता नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT